हंगामा – पान १७ (समाप्त)

तुकाजी हे काहीतरी नवीनच ऐकत होता. रामचंद्र काळा की गोरा त्याला माहित नव्हतं. भट्टीवर लागलेल्या आगीला तोच जबाबदार आहे असं वाटून त्याने आणि त्याच्या माणसांनी दिवसभर रामचंद्राचा शोध घेतला खरा, पण तो काही सापडला नव्हता आणि आता इन्स्पेक्टर जमदाडे काहीरी वेगळंच ऐकवत होते त्याला.

“अवो सायेब, आमी समद्ये त्याला हुडकत व्हतो पन त्यो गावला नाय आमाला. त्याला शोधून म्या थेट हितच आलो बगा. आन्‌इनाकारन कशापायी मारलं आस्तं? भट्टीला आग त्यानंच लावली व्हती. हाताला लागला असता तर खरंच जित्ता ठेवला नस्ता.” तुकाजी म्हणाला.

“अरे चूप! चोराच्या उलट्या बोंबा!! आणि पोलिसांसमोर धमक्या देतोयंस? तू नाही मारहाण केलीस त्याला तर मग काय या गावतल्या भुताटकीनं केली का?” इन्स्पे. जमदाडे ओरडले. “हं! भुताटकी आहे म्हणे गावात. अरे तुक्या, तुझ्या भट्टीवर हल्ला झाला तो गावाबाहेरच्या झाडांवर असलेल्या माकडांनी केला. जरा डोकं चालव. आजपर्यंत तुमच्या गावात फक्त दारू प्यायलेल्या माणसांवरच हल्ला का झाला? कारण दारूचा वास माकडांना बेभान करायचा. त्यांना दारू हवी होती आणि ती कुठे मिळणार होती?.. तुझ्या भट्टीवर आणि गुत्त्यावर… मग दुसरीकडे कशाला जातील ती? काल असंच काहीतरी झालं असणार, ज्यामुळे तुझ्या भट्टीला आग लागली. बोलून चालून माकडंच ती.”

तुकाजीच काय पण धनाजीच्या घराबाहेर जमलेले सगळेच गावकरी आ वासून हे ऐकत होते.

“गावात येताना तुम्ही लोक माकडांना काही ना काही खायला प्यायला देता ना? तुमच्याच गावातल्या कुणा मुर्ख माणसाने माकडांना दारू पाजली होती दारू! कळतंय का काही? अरे माकडं आहेत ती! त्यांना दारू पाजली तर ती काय करणार?”

“हंगामा!” कुणीतरी बोललं.

“कळलं? चल आता, तुक्या. स्वत:सोबत मोठ्या भावालाही अडकवलंस तू.” इन्स्पे. जमदाडे म्हणाले.

तुकाजीने खाली मान घातली. गावात येता जाता माकडांची चेष्टा करण्यासाठी तो माकडांच्या अंगावर दारूची रिकामी बाटली फेकायचा. त्याचं पर्यावसान अशा प्रकारात होईल हे त्याला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. त्याच्या मते भुताटकीचे प्रकार करणारा धनाजीरावांच्या हितशत्रूंपैकी कुणीतरी होता. सुटकेचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने इन्स्पेक्टर जमदाड्यांसमोर हात जोडले.

“अवो सायेब, आयच्यान सांगतो. म्या भट्टी चालिवली पन त्या रामचंद्राला म्या हातबी लावला नाय. आवो म्या त्येला बगीतल्यालंच न्हाय तर.” तुकाजी काकुळतीला येऊन सांगत होता पण जमदाड्यांनी त्याचं काही न ऐकता त्याला पुढे ढकलला.

हातात बेड्या घातलेले धनाजी आणि तुकाजी, सोबत इन्स्पेक्टर, तीन हवालदार आणि मागे गावकरी अशी सगळी वरात निघाली. जीपमधे बसल्यावरही तुकाजीच्या मनात एकच प्रश्‍न घोळत होता, “रामचंद्राला कुणी मारहाण केली असेल?” गावाच्या वेशीपाशी येताच जीपवर काहीतरी खळ्ळक्‌न फुटल्याचा आवाज आला. ड्रायव्हरने जीप थांबवून बाहेर पाहिलं. “बाटली!” तो उद्गारला. धनाजी खाऊ का गिळू अशा नजरेने तुकाजीकडे पहात होता. तुकाजीने काही खालची मान वर केली नाही.

इकडे तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलमधे प्लॅस्टरमधे हात घेऊन बसलेल्या रामचंद्राला दौलती सांगत होता, “म्या फकस्त पंधरा यीस दारूच्या बाटल्या सांडवत येशीपासून भट्टीपर्यंत नेल्या व्हत्या. पन माकडं दारूच्या वासानं पगलं होऊन एवडं काय करतील आसं काय मला वाटलं न्हवतं. नशीब! माह्यासोबत आनखी दोन जन व्हते म्हून, नायतर मलाबी झाली असती… भुताटकीची बाऽऽधा.”

त्याचं बोलणं ऐकून रामचंद्र जोरात हसला पण त्याच्या जबड्याला कळ लागली. कळ सहन करता करता तो म्हणाला, “दौलती, म्या तुला माझ्या तोंडावर जास्त मारायला सांगितलं व्हतं, तर तू तोंडावर कमी मारलंस आन्‌हात तेवडा फॅक्चर करून ठिवलास बग.”

दौलती खिदळत म्हणाला, “आता मला काय माहित फॅक्चर व्हईल ते? म्या फकस्त जोरात पिरगाळला व्हता. पन या हातामुळंच धनाजीसंग तुकाजीलाबी आत धाडायची सोय झाली का न्हाई?

रामचंद्राने मान डोलवत दुसर्‍या हाताने दौलतीला टाळी द्यायला हात उचलला पण समोरून धावत येणार्‍या कमळी आणि तिच्या सासूला पाहून तो नुसताच कण्हत राहिला.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

bonus

bonus
नवी दिल्ली – रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी दसऱ्याच्या आधी केंद्रीय कॅबिनेटने भेट दिली असून रेल्वे कर्मचाऱ्यांना कॅबिनेटने ७८ दिवसांचा उत्पादकता बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, कॅबिनेटने वर्ष २०१५-१६ च्या उत्पादकतेशी संबंधीत ७८ दिवसांचा बोनस देण्यास मंजुरी दिली आहे. मागील चार वर्षापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना इतकाच बोनस मिळत आला आहे. दसऱ्याच्या आधी रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी उत्पादकतेशी संबंधीत बोनस दिला जातो. रेल्वे आर्थिक संकटात असूनही रेल्वेने कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनससाठी रेल्वेला २ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

The post रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

प्लेबॉय मासिकात पहिल्यांदाच झळकणार हिजाब गर्ल

noor

noor
पहिल्यांदाच हिजाब परिधान केलेल्या महिलेची छायाचित्रे अश्लिल छायाचित्रांसाठी ओळखले जाणारे प्लेबॉय मासिकात छापणार आहे. अमेरिकी पत्रकार असलेली नूर टागौरी नावाची ही तरुणी ऑक्टोबरच्या अंकात प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे. या अंकात जीवनात आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी स्वतःच्या जीवाचीदेखील परवा न करणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे छापली जाणार आहेत. अमेरिकेतील Newsy चॅनेलमध्ये २२ वर्षिय नूर काम करते. प्लेबॉयच्या फोटोशूट दरम्यान ती काय परिधान करणार आहे याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. नूर मूळची लीबियाची असून, हिजाब परिधान करून अँकरींग करणारी अमेरीकेतील ती पहिली महिला आहे. आपण काम करत असलेल्या क्षेत्रात हिजाब परिधान करून काम करताना खूप संघर्ष करावा लागल्याचे तिने म्हटले होते.

सोशल मीडियावर प्रसिध्द असलेल्या नूरला इन्स्टाग्रामवर लाखोजण फॉलो करतात. अनेकांना तिचा हा निर्णय योग्य वाटला नाही. आपली ओळख निर्माण करण्यासाठी गेली अनेक वर्षे महिलांची अश्लिल छायाचित्रे छापणाऱ्या मासिकाची नूरने निवड का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

The post प्लेबॉय मासिकात पहिल्यांदाच झळकणार हिजाब गर्ल appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

रद्द होऊ शकते ‘सार्क’ परिषद

saaarc

saaarc
नवी दिल्ली- नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात होणा-या १९व्या सार्क परिषदेत भारतासह अफगणिस्तान, भूतान व बांगलादेशने सहभागी होण्यास नकार दिल्याने ही परिषद रद्द झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी आज दिली आहे

केंद्र सरकारने उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविषयी घेतलेली तीव्र भूमिका कायम राखत नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादेत होणाऱ्या सार्क परिषदेवरही बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस जाणार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. सार्कमधील इतर सदस्य देशांपैकी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेवर बहिष्कार घातला असून, परिषद रद्द झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, भारताने उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्कच्या परिषदेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

दक्षिण आशियाई विभागाचा विकास आणि परस्पर सहकार्य याविषयी भारत कटिबद्ध आहे; पण हे सर्व दहशतवादमुक्त वातावरणातच होऊ शकते. या भागातील एक राष्ट्र दहशतवादमुक्तीच्या प्रयत्नांच्या विरोधात काम करत आहे. गेल्या काही दिवसांतील घटना आणि घडामोडी पाहता इस्लामाबादमध्ये आयोजित सार्कच्या परिषदेमध्ये भारत सरकार सहभागी होऊ शकत नव्हते. सार्कचे सध्याचे अध्यक्ष असलेल्या नेपाळलाही याची कल्पना दिली आहे. सीमेपलीकडून हल्ले होत असताना दहशतवादमुक्त परिषद घेता येऊ शकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

The post रद्द होऊ शकते ‘सार्क’ परिषद appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

धुळेही लाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने झाले भगवे

maratha-morcha

maratha-morcha
धुळे -धुळे शहरात आज सकल मराठा समाजाच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी मूकमोर्चा काढण्‍यात आला. लाखो समाजबांधवांनी विविध मागण्‍यांचे फलक, भगवे झेंडे आणि भगव्‍या टोप्‍या परिधान करुन या मोर्चात सहभाग घेतला होता. मराठा समाजबांधव सकाळी ९.३० पासून शहरात एकत्र यायला सुरुवात झाली, धुळ्यात परिसरातील ५० गावातून लोक पायी दाखल झाले. शिवाय नाशिक आणि जळगाव जिल्‍ह्यातील मराठा बांधवांचीही मोठ्या संख्‍येने या मोर्चात उपस्‍थिती होती.

पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरूवात झाली. त्‍यापूर्वी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्‍यक्‍त केले. विविध मागण्‍यांच्‍या पाट्या घेऊन युवक युवती मोठ्या संख्‍येने या मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड व अग्रसेन महाराज यांच्‍या पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी एकत्र आले. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावले होते.

या मोर्चाच्‍या प्रत्‍येक हालचालीवर तीन ड्रोन कॅमे-यांच्‍या मदतीने नजर ठेवली गेली. आतापर्यंत राज्‍यभरातील मोर्चामध्‍ये घडलेले शिस्‍तीचे दर्शन धुळ्यातही घडले. ३५०० स्‍वयंसेवकांचा या मोर्चात सहभाग होता. आज शहरातील शाळांना सुटी मोर्चामुळे देण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लाऊन वाहतूक वळवण्‍यात आली होती.

The post धुळेही लाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने झाले भगवे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

वायू प्रदुषणामुळे भारतातील ७५ टक्के मृत्यू : जागतिक आरोग्य संघटना

who

who
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे ‘इस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा…’ अशी चित्रपटाच्या सुरुवातीला लागणारी ही जाहिरातीतील वाक्य आता हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२च्या आकडेवारीनुसार वायू प्रदुषणामुळे वर्षभरात ६ लाख २१ हजार १३८लोकांचा मृत्यू होतो. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू वायू प्रदुषणाशी संबंधित असतात. बहुतांश लोकांना श्वसनाचे विकार, हृदयरोग, तसेच फुफ्फुसाशी संबंधित आजार झाले आहेत.

भारतात हृदयरोगामुळे २०१२च्या आकडेवारीनुसार २ लाख ४९ हजार ३८८ जणांचे मृत्यू होतात. जगभरात प्रत्येक १० पैकी ९ जण घातक हवेचे श्वसन करत आहेत. वायू प्रदुषणामुळे होणारे ९० टक्के मृत्यू हे मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत. अर्थात प्रत्येक गोष्टीला असतात तसे या समस्येपासून सोडवणूक करण्यासाठी देखील उपाय आहेत.

आजच्या घडीला तंत्रज्ञान विकसित होत आहे, तर नवनवे शोध लागत आहेत. त्याद्वारे मानवी जीवनही सुलभ होत आहे. मात्र असे असले तरी माणसाचे सरासरी आयुष्यमान कमी होत चालले आहे. विकासाच्या आडून येत असलेला प्रदूषणरुपी राक्षस त्यास जबाबदार आहे. त्याला वेळीच गाडले नाही, तर मानवाचा विनाश अटळ आहे.

The post वायू प्रदुषणामुळे भारतातील ७५ टक्के मृत्यू : जागतिक आरोग्य संघटना appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

काचेच्या पुलावर नो ‘हाय हिल्स’

bridge

bridge
आता पर्यटकांसाठी पुन्हा एकदा जवळपास १० विश्वविक्रम नावावर असलेला चीनमधला आणि जगातला पहिला वहिला काचेचा पूल खुला करण्यात आला असून या पूलाचे गेल्याच महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र दोन आठवड्यातच हा पूल बंद करण्याची वेळ पूल बांधणा-या कंपनीवर आली होती. हा विश्वविक्रमी काचेचा पूल पाहण्यासाठी दरदिवशी हजारो संख्येने पर्यटक येथे येत होते. वास्तविक पाहता फक्त ८ हजार पर्यटकांचे वजन पेलू शकेल इतकी क्षमता या पूलाची होती. मात्र दरदिवशी कुतूहल म्हणून किंवा या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी जवळपास १० हजार पर्यटक या पुलाला भेट देण्यासाठी येऊ लागले त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी तो बंद करण्यात आला होता.

आता हा पूल पुन्हा ऑक्टोबर पासून सुरू करण्याची घोषणा कंपनीने केली असून पण तो सुरु करताना पर्यटकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार महिला पर्यटकांना या पुलावर हाय हिल्स घालण्यात बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फोन आणि पैशाचे पाकिट याव्यतिरिक्त कोणत्याही वस्तू येथे नेण्यात पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. तसेच पूल ओलांडताना रेलिंगन्साना हात न लावता तो ओलांडण्याची सूचना देखील करण्यात आली आहे.

The post काचेच्या पुलावर नो ‘हाय हिल्स’ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

चक्क मोफत मिळणार ‘Freedom 251’

ringing-bells

ringing-bells
नवी दिल्ली – एकदा पुन्हा अवघ्या २५१ रुपयांत स्मार्टफोन देणारी कंपनी रिंगिंग बेल्स चर्चेत आली असून आपला पहिला वर्धापन दिन कंपनी साजरा करत आहे. यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तीन स्पेशल आणि आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

ग्राहकांना आता हायटेक फीचर्सने अद्ययावत ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोन चक्क मोफत देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिंगिंग बेल्सने केवळ २५१ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. गॅजेट मार्केटमध्ये या फोनची जोरदार चर्चाही झाली होती.

३ नव्या स्कीम रिंगिंग बेल्सने प्रथम वर्धापन दिनाला लॉन्च केल्या आहेत. तिनही स्कीम कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्रामशी संबंधित आहेत. यासाठी ग्राहकाला कंपनीचा एखादा लॉयल्टी प्रोग्राम घ्यावा लागेल. याचा अर्थ असा की, कंपनीच्या तीन पैकी एका प्लानची मेंबरशिप घ्यावी लागेल. मेंबरशिप मिळाल्यानंतर ग्राहकाला मोफत ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोनसह अनेक लाभ मिळतील. यामध्ये ग्राहकांना एक वर्षासाठी मेंबरशिप मिळेल. त्यात त्यांना ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोन मोफत देण्यात येईल. त्याचप्रमाणे RBPL (Ringing Bells Pvt. Ltd.) प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल.

The post चक्क मोफत मिळणार ‘Freedom 251’ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

पठाणकोट परिसरात संशयितांचा वावर

pathankot

pathankot
चंदीगड- पठाणकोटमध्ये संशयित शस्त्रधारी व्यक्ती स्थानिक नागरिकांना दिसल्याने घटनास्थळी शोध मोहिम हाती घेण्यात आली असून, अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली आहे.

मंगळवारी संशयित चार शस्त्रधारी व्यक्ती स्थानिक नागरिकांना आढळून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळविली होती. याबाबत माहिती देताना पठाणकोट जिल्हा पोलिसचे मुख्य अधिकारी राकेश कौशल यांनी सांगितले की, याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर छक्की नदीच्या किनारी व जवळ असलेल्या जंगलामध्ये जवानांनी शोधमोहिम सुरू केली आहे. परंतु, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी तपास मोहिम हाती घेण्यात आली असून, अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

The post पठाणकोट परिसरात संशयितांचा वावर appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

‘एम. एस. धोनी’वर पाकिस्तानची बंदी!

dhoni

dhoni
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी‘ या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी येण्याची दाट शक्‍यता असून भारतामध्ये हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, ‘एम. एस. धोनी‘ चित्रपटाच्या वितरणाचे पाकिस्तानमध्ये हक्क आयएमजीसी ग्लोबल एंटरटेन्मेंट या कंपनीकडे होते. मात्र, सद्यस्थितीतील दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध पाहता हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करू नये, अशी भूमिका या कंपनीने घेतली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक‘ आणि रितेश देशमुख यांचा ‘बॅंजो‘ हे दोन चित्रपट पाकिस्तानमधील थिएटर्समध्ये झळकले आहेत. हिंदी चित्रपटांना दणदणीत प्रतिसाद मिळत असला, तरीही अनेक चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदीही घातली गेली आहे. जॉन अब्राहम-वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ढिशूम या चित्रपटावरही पाकिस्तानने बंदी घातली होती.

The post ‘एम. एस. धोनी’वर पाकिस्तानची बंदी! appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Nisha Palace © 2016